Bhosari

मोशीत वृध्दाकडून २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग

By PCB Author

February 16, 2019

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – एका ६० वर्षीय वृध्दाने २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक  प्रकार शुक्रवारी (दि.१५) दुपारी साडेबारा वाजता मोशी येथे घडला आहे.

नारायण पोखरकर (वय.६० रा. साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे. याबाबत पीडित तरूणींने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरूणी बनकर वस्ती, मोशी येथे आपल्या घरात होती. त्यावेळी घरात जाऊन आरोपी पोखरकर याने मला तुमच्याबद्दल प्रेमभाव आहे, असे म्हणत तरूणींशी अश्लिल चाळे करत विनयभंग केला.

या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहे.