मोशीत विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
763

मोशी, दि. २० (पीसीबी) – शुक्रवार (दि.१५) तुपे वस्ती मोशी येथे राहत्या घरात एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणाचा आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विनोद ज्ञानेश्‍वर पाटील (वय २१, रा. तुपे वस्ती, मोशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.१५) फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास विनोद याने राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हे समजताच विनोद याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र आज (बुधवारी) पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजु शकले नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर तपास करत आहेत.