मोशीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; दोघांना अटक

0
577

मोशी, दि. १३ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तिघा जणांच्या टोळक्यांनी एका तरुणाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्यावर धारदार कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि.१२) दुपारी साडेचारच्या सुमारास मोशी भाजी मार्केटजवळ घडली.

शुभम असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल विश्वनाथ शिनगारे (वय २८, रा. मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अक्षय उर्फ टकल्या सुदाम गायकवाड (वय २०), शुभम बाळू खरात वय २१, (दोघे रा. गांधीनगर मोशी) आणि इस्तियाक खान असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांचा भाचा शुभम आणि तिघा आरोपींचे मागील काही दिवसांपूर्वी रिक्षा हळू चालवण्यावरुन भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आरोपींनी शुभमच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला आहे.  याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अक्षय आणि शुभम या दोघांना अटक केली आहे. तर इस्तियाक हा अद्याप फरार आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.