Bhosari

मोशीत दुकानात घुसून साहित्याची तोडफोड करत महिलेला धमकी  

By PCB Author

November 12, 2018

मोशी, दि. १२ (पीसीबी) – पाण्याची बाटली न दिल्याच्या कारणावरुन एका टवाळखोराने किराणा मालाच्या दुकानात घुसून दुकानातील २४ वर्षीय महिला आणि तीच्या पतीला शिवीगाळ करत दुकानातील साहित्याची तोडफोड केली आणि बघुन घेण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि.१०) सायंकाळी सहाच्या सुमारास मोशीतील दक्षिण लक्ष्मीनगर येथील मॉजीसाँ सुपर मार्केट या दुकानात घडली.

याप्रकरणी महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोविंद तांबोरे (रा. दक्षिण लक्ष्मीनगर) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे मोशीतील दक्षिण लक्ष्मीनगर येथे मॉजीसाँ सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. ते दुकान महिला आणि तिचे पती चालवतात. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी गोविंद याने पाण्याची बाटली न दिल्याच्या कारणावरुन दुकानात घुसून दुकानातील साहित्याची तोडफोड केली. तसेच महिला आणि तिच्या पतीला बघुन घेण्याची धमकी देऊन निघून गेला. याप्रकरणी गोविंद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.