Bhosari

मोशीत दिड लाखांची घरफोडी

By PCB Author

February 26, 2019

मोशी, दि. २६ (पीसीबी) – बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या मुर्त्या आणि रोख असा एकूण १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवार (दि.२५) रात्री एकच्या सुमारास मोशी गायकवाड वस्ती येथील रिव्हर ब्रिज हौसिंग सोसायटी येथील फ्लॅट नं.५०८ मध्ये घडली.

याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मोशी गायकवाड वस्ती येथील रिव्हर ब्रिज हौसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट नं.५०८ हे घर आहे. सोमवारी त्यांचा फ्लॅट कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तसेच कपाटात ठेवलेले ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, ३७ हजार ५०० रुपये किमतीचा लक्ष्मीहार, १२ हजारांच्या चांदीच्या मुर्त्या आणि रोख ४० हजार रोख असा एकूण १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.