Bhosari

मोशीत किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीवर केले चाकुने वार

By PCB Author

March 26, 2019

मोशी, दि. २६ (पीसीबी) – “भांड्याच्या रॅकला अडकवलेल्या बॅगेतून पैसे घ्या” असे बोलल्याचा राग आल्याने पतीने २० वर्षीय पत्नीवर चाकुने सपासप वार करुन जखमी केले. ही धक्कादायक घटना सोमवार (दि.२५) सकाळी साडेसहाच्या सुमारास मोशी आदर्शनगर येथील वाघमारे वीट भट्टीजवळ घडली.

याप्रकरणी जखमी २० वर्षीय पत्नीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती देवीदास गंगाराम गांगुर्डे (रा. मालेगाव, साकोरी, जि. नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी देवीदास याला गावाला जायचे होतो. यामुळे त्याने पत्नीला उठवून पैशांची मागणी केली.  यावर पत्नीने “भांड्याच्या रॅकला अडकवलेल्या बॅगेतून पैसे घ्या” असे सांगितले. या गोष्टीचा देवीदास याला राग आला आणि त्याने घरातील चाकुने पत्नीच्या हातांच्या बोटांवर आणि कानावर सपासप वार केले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात देवीदास विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.