मोशीतील तरुणाला घातक हत्यारासह अटक

0
487

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – लोखंडी रॅम्बो सुरा स्वत:जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.२०) सायंकाळी पाचच्या सुमारास मोशीतील चौधरी ढाब्याजवळ करण्यात आली.

आकाश बबन लांडगे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, दक्षिण मोशी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई किरण खेडकर यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भोसरी एमआयडीसी पोलीस मोशी परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना माहिती मिळाली कि, एक तरुण मोशीतील चौधरी ढाब्याजवळ थांबला असून त्याच्याजवळ घातक हत्यार आहे. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी आकाश याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक घातक लोखंडी रॅम्बो सुरा आढळून आला. पोलिसांनी तो सुरा जप्त करुन आकाश याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे तपास करत आहेत.