Bhosari

मोशीतील तरुणाला घातक हत्यारासह अटक

By PCB Author

April 22, 2019

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – घातक सुरा जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.२०) सायंकाळी सहाच्या सुमारास मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथील भाजी मार्केटजवळ करण्यात आली.

कुणाल प्रकाश कांबळे (वय १९, रा. आल्हाटवाडी, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रविण माने यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसी पोलीस मोशी परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना माहिती मिळाली कि, एक तरुण मोशीतील बोऱ्हाडेवाडी भाजी मार्केटजवळ थांबला असून त्याच्याजवळ घातक हत्यार आहे. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी आकाश याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक घातक लोखंडी सुरा आढळून आला. पोलिसांनी तो सुरा जप्त करुन कुणाल याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे तपास करत आहेत.