मोशी येथील दगड खान लगत असलेल्या कचरा डेपोला गुरुवारी (दि. २९) सायंकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या. तब्बल बारातासनंतर रात्री उशीरा अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

रात्रीच्या वेळी अंधार असल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या. याशिवाय घटनास्थळी जाण्यासाठी केवळ एकच अरुंद रस्ता असल्याने अडचण येत होते. कचरा डेपोमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यात  प्लास्टिकचे प्रमाण जास्त असल्यामुळे आगीने खूपच विक्राळ स्वरुप धारन केले होते. याशिवाय मोकळ्या मैदानातील हवेमुळे कचरा अधिक वेगाने पेट घेत  होता.  यामुळे आगीतून येणाऱ्या प्राण घातक धुराचा नाहक त्रास स्थानिकांना सहन करावा लागला. आग विझविण्याकरता पाणी अपुरे पडत असल्याने अग्निशामक दलाने दहा खासगी टँकरचीही मदत घेण्यात आली होती. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.