Pimpri

मोरवाडी मध्ये उभारतय ‘भव्य अपंग-भवन’; काम आहे प्रगतीपथावर

By PCB Author

January 01, 2021

मोरवाडी, दि.०१ (पीसीबी) : पिंपरीतील मोरवाडी येथे भव्य अपंग भवन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत आहे. त्याचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून त्याचा आढावा घेण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी भेट देऊन पाहणी केली.

शहरातील अपंग नागरिकांना त्यांच्या सोयी सुविधांची माहिती मिळावी, त्यांच्या समस्या, शासनाकडून मिळणा-या योजनांच्या लाभाची माहिती अपंग भवनात आता मिळू शकणार आहे. या भव्य वास्तुची पाहणी करण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी आज सकाळी पाहणी केली. प्रत्यक्ष चालू कामाचा आढावा घेऊन तातडीने कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी त्याठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांना दिल्या.

यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे भव्य वास्तू उभारण्यात येत आहे. त्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून काही महिन्यांतच अपंग भवन सुरू होणार आहे.