मोरवाडीत फुकट मन्च्युरियन खायल्या न दिल्याने तरूणाच्या गालावर चाकूने वार

0
531

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – फुकट मन्च्युरियन खायला न दिल्याच्या रागातून एका चायनिज मन्च्युरियनचे दुकान चालविणाऱ्या तरूणाच्या गालावर चाकूने वार केला. ही घटना मंगळवार (दि. ११ सायं. ४:३०) च्या सुमारास मोरवाडीतील कापसे गार्डन समोर घडली.

याप्रकरणी कमाल मोर्तुज शेख (वय १८) (रा. नाणेकर चाळ पिंपरी) याने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केशव नगर, सतिश पवार (रा. लालटोपीनगर मोरवाडी पिंपरी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कमाल यांचे मोरवाडी कापसे गार्डन समोर चायनीज मन्च्युरियनचे दुकान आहे. मंगळवारी (सायं. ४:३०) च्या सुमार आरोपी तिथे आला. त्याने कमाल याला मला फुकट मन्च्युरियन खायला दे असे म्हणला. त्यावर कमाल याने त्याला मन्च्युरियन देण्यास नकार दिला. यामुळे केशवने कमालच्या डाव्या गालावर चाकूने वार केला आणि पसार झाला. केशवला अध्याप अटक करण्यात आली नाही. पिंपरी पोलिस तपास करत आहे.