Chinchwad

मोरवाडीत दोन टँकरचा विचित्र अपघात; चालक जखमी

By PCB Author

December 02, 2018

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – पाठोपाठ चाललेल्या दोन टँकरच्या विचित्र अपघातात एका टँकरचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (रविवारी) पहाटे तीनच्या सुमारास मोरवाडी येथील होंडा शोरुम समोरील मुंबई-पुणे हायवेवर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीनच्या सुमारास मोरवाडी येथील होंडा शोरुम समोरील मुंबई-पुणे हायवेरुन (टँकर क्र. एमएच/४३/यू/३२५९) आणि (टँकर क्र.एमएच/०५/एएम/२२०५) हे दोन टँकर एकापाटोपाठ चालले होते. यावेळी पाठी मागच्या बाजूचा (टँकर क्र.एमएच/०५/एएम/२२०५) हा टँकर पुढील टँकरवर आदळला. आणि अपघात झाला. यामध्ये ड्रायवरच्या कॅबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर टॅकरचालक जखमी झाला आहे. हे दोन्ही टँकर भररस्त्यातच उभे आहेत. यामुळे वाहतूकीस आढथळा निर्माण होत आहे. आणि अपघात होण्याची शक्यता आहे.