Pimpri

मोरवाडीत जाणुनबुजन धक्का देऊन तरुणाला जबर मारहाण

By PCB Author

April 11, 2019

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – जाणुनबुजन धक्का देऊन एका तरुणाला दोघाजणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.१०) सायंकाळी आठच्या सुमारास मोरवाडीतील लालटोपीनगरमध्ये घडली.

रोहीत अशोक वाघमारे (वय २२, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रदिप सुर्यवंशी आणि संदिप जानराव (दोघे रा. लालटोपीनगर मोरवाडी, पिंपरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास फिर्यादी रोहीत हे त्यांच्या लालटोपीनगर येथील घरी जात होते. यावेळी रस्त्यात उभे असलेले आरोपी प्रदिप आणि संदिप या दोघांनी रोहीतला जाणुनबुजन धक्का दिला. तसेच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप दोघांनाही अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.