मोबाईल हिसकावणा-यांना विरोध केल्याने तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

0
865

चिंचवड, दि. २४(पीसीबी) -तीन चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्यांनी तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री सव्वा आठ वाजता वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

रमेश नारायण खारमाटे (वय 28, रा. तळेगाव दाभाडे,. मूळ रा. अहमदनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी शनिवारी (दि. 23) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या जुन्या रूम जवळ गुरुद्वारा चौक येथे एमपीएससीची जुनी पुस्तके आणण्यासाठी शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजता जात होते. ते गुरुद्वारा चौकातील रेल्वे बोगद्याच्या खाली आले असता तीन अनोळखी चोरट्यांनी त्यांचा मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी रमेश खारमाटे यांनी आरोपींना प्रतिकार केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांचा पाठलाग केला. एकाने रमेश यांचे हात पकडले तर दुस-याने सिमेंटचा गट्टू त्यांच्या डोक्यात मारला. यात रमेश गंभीर जखमी झाले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.