Desh

मोदी हे पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे – शशी थरूर

By PCB Author

October 28, 2018

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे असल्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील एका खास  सूत्राच्या हवाल्याने काँग्रेस नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे. त्या सूत्राने एका पत्रकाराला हे सांगितले होते. या पत्रकाराचा उल्लेख थरुर यांनी आपल्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकात केला आहे.

बेंगळुरु लिट फेस्टमध्ये थरुर यांनी आपल्याच पुस्तकातील काही पाने उपस्थितांसमोर वाचून दाखवली. ते म्हणाले, आरएसएसमधील एका सूत्राने एक असाधारण रुपकाचा उल्लेख एका पत्रकारासमोर केला होता. मी त्याचा संदर्भ माझ्या पुस्तकात दिला आहे. मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारुही शकत नाही.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे ईशान्य भारतातील विचित्र आणि हास्यास्पद टोपी परिधान करतात. पण मुस्लिमांची टोपी घालण्यास नकार देतात. भाजपने हा ईशान्य भारतातील लोकांचा अवमान असल्याचे म्हटले होते. नुकतेच त्यांनी मोदींवर लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख करताना शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘floccinaucinihilipilification’ या शब्दाचा वापर केला होता.