Notifications

मोदी सरकारला दणका; आंध्रप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’वर बंदी

By PCB Author

November 17, 2018

कोलकता, दि. १७ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या सर्वोच्च     स्वतंत्र तपास यंत्रणा ‘सीबीआय’ला  आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रप्रदेशमध्ये बंदी घातली. आता पश्चिम बंगालमध्येदेखील सीबीआयवर बंदी घालण्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोदी सरकारला हा फार मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे.