Desh

मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे – तृणमुल काँग्रेस

By PCB Author

April 29, 2019

कोलकाता, दि. २९ (पीसीबी) –  तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार सोडा, तुमच्यासोबत एक सल्लागारही येणे कठीण आहे. तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत आहात की घोडेबाजार करत आहात? असा सवाल करून मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे, अशी घणाघाती टीका तृणमूलचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी केली आहे.

डेरेक ओ ब्रायन म्हणाले की, मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे. तुम्ही निवडणूक प्रचारात घोडेबाजार केल्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान  मोदी यांनी पश्चिम बंगालमधील सेरमपूर येथील सभेत बोलताना ममतादीदींचे ४० आमदार तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट  केला आहे. या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आहे.