Banner News

मोदी सरकारचा निर्णय; प्रत्येक नागरिकाच्या खात्यात जमा होणार दरमहा २५०० हजार रूपये ?  

By PCB Author

December 26, 2018

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवामुळे भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकानुयी निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.   भाजपला पाच  राज्यांच्या निवडणुकांमध्ये जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे मोदी सरकारने जनतेला खूश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर दरमहा अडीच हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. यूनिव्हर्सल बेसिक इन्कम ( यूबीआय) या योजनेतर्गंत ही रक्कम नागरिकांच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे.   

देशातील नागरिकांचे मासिक उत्पन्न  वाढवण्यासाठी  ही योजना सुरू केल्याचे सांगितले जात आहे. १५ जानेवारीनंतर ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे.  सुरुवातीच्या टप्प्यात केवळ शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे.  त्यानंतर टप्याटप्याने प्रत्येक नागरिकांसाठी ही  योजना सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मोदी सरकारला सत्तेवर येऊन साडेचार वर्षे झाली, तरी या आश्वासनाची पूर्तता  केलेली  नाही. यावर विरोधी पक्षांकडून सतत टीका होऊ लागल्यानंतर भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हे आश्वासन म्हणजे चुनावी जुमला होता, असे म्हटले होते.

आता ही मोदी सरकारने अडीच हजार रूपये जमा करण्याचा घेतलेला निर्णय चुनवी चुमला ठरू नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी होणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्याची शक्यता आहे.