मोदी शिवरायांच्या विचारांवर चालणारे पण महाराजांशी तुलना अशक्य – एकनाथ खडसे

0
380

सोलापूर,दि.२१(पीसीबी) – काँग्रेस ज्याप्रमाणे गांधी आणि नेहरूंच्या विचाराने चालतात त्याप्रमाणे नरेंद्र मोदी शिवरायांच्या विचारानं चालत आहेत. महाराजांच्या विचारांवर चालणं काही चुकीचं नाही मात्र त्यांची शिवरायांशी तुलना होवू शकत नाहीत, असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

“तान्हाजी” या चित्रपटातील पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराज आणि गृहमंत्री अमित शहांची तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून यावर एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. पंढरपूरमध्ये ते विठ्ठल दर्शनाला होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडी सरकारचे पन्नास दिवसात पन्नास वैचारिक मतभेद समोर आले आहेत. मात्र पुरोगामी कॉंग्रेस, राष्ट्रवादीने कट्टर हिंदूत्ववादी सेनेशी आघाडी केली आहे. सत्तेसाठी हे तीनही पक्ष आपली विचारधारा विसरलेत. त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकणार हे येणारा काळच ठरवेल, असंही खडसेंनी म्हटलं आहे.