मोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड ट्रम्प

765

न्यूयॉर्क, दि. २४ (पीसीबी) – संयुक्त राष्ट संघाच्या एका उच्चस्तरीय बैठकीवेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी मोदी आणि भारताची तोंडभरून स्तुती केली. ‘माझं भारतावर प्रेम आहे आणि मोदी माझे मित्र आहेत’, असे ट्रम्प म्हणाले.

संयुक्त राष्ट्र संघाच्या या उच्चस्तरीय बैठकीत मादक पदार्थांच्या वैश्विक समस्येवर चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालीच हे चर्चा सत्र पार पडले. यावेळी संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी सुषमा स्वराज यांची गळाभेट घेऊन त्यांची ट्रम्प यांच्याशी भेट घालून दिली. त्यावेळी मोदी यांनी तुमच्यासाठी शुभेच्छा पाठवल्याचं स्वराज यांनी ट्रम्प यांना सांगितले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता ‘माझे भारतावर प्रेम आहे. मोदी माझे मित्र आहेत. त्यांना माझा नमस्कार सांगा’, असे ट्रम्प म्हणाले.