मोदी भेटीचा हट्ट धरणा-या तृप्ती देसाईना पुण्यात अटक

0
299

पुणे, दि. १९ (पीसीबी) – सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहेत. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. मात्र त्याआधीच पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.