Desh

मोदी निर्ल्लज पंतप्रधान, त्यांची उमेदवारी रद्द करा – ममता बॅनर्जी

By PCB Author

April 30, 2019

कोलकाता, दि. ३० (पीसीबी) – नरेंद्र मोदी हे निर्ल्लज पंतप्रधान आहेत. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी,जेणेकरून निवडणुकीच्यावेळी घोडेबाजार होणार नाही, अशा शब्दांत तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घणाघाती टीका केली आहे.  

आज (मंगळवारी)  हुगळी जिल्ह्यातील प्रचारसभेत  बोलताना ममता बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधला.   मोदी यांनी प्रचार सभेतबोलताना  २३ मे रोजी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील,  असा  खळबळजनक दावा केला होता.  यावर बॅनर्जी यांनी पलटवार केला आहे.

ममता बॅनर्जी  म्हणाल्या की,   मोदी यांचे  विधान  घटनाविरोधी असून ते घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहेत.  तृणमूल काँग्रेस भाजपप्रमाणे नाही. भाजपमध्ये चोरांचा भरणा असून ते केवळ पैशासाठी काम करतात. तर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते त्यागवृत्तीने काम करतात. त्यामुळे मला कसलीही चिंता वाटत नाही, असे त्या म्हणाल्या.