मोदी, नितीश कुमार यांच्यामध्ये लैला-मजनू पेक्षाही अधिक प्रेम – असदुद्दीन ओवैसी

0
586

पाटना,  दि. १४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. यांचे प्रेम इतिहासातील अजरामर जोडी लैला-मजनू यांच्यापेक्षाही जास्त आहे, अशा शब्दांत एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी  मोदी आणि   नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला.

ओवैसी म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या दोघांमध्ये खूप प्रेम आहे. यांचे प्रेम लैला-मजनूहूनही खूप जास्त आहे. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांची प्रेमकहाणी लिहिली जाईल, तेव्हा त्यांच्यातील लैला कोण आणि मजनू कोण? हे मला विचारु नका, ते तुम्हीच ठरवा.

ओवैसी म्हणाले की,  लैला आणि मजनू ऐका, तुमची प्रेम कहाणी लिहिली जाईल, तेव्हा त्यामध्ये प्रेमाऐवजी केवळ द्वेष लिहिला जाईल. जेव्हापासून दोघे एकत्र आले तेव्हापासून भारतात हिंदू आणि मुस्लिमांममध्ये तणाव निर्माण झाला, असे या प्रेम कहाणीत लिहिले जाईल.