मोदी जितके लोकप्रिय होतील; तितकेच सामुहिक हल्ले वाढतील

0
585

जयपूर, दि. (पीसीबी) – देशभरात जमावाकडून होणारे सामूहिक हल्ले व हत्या हा मोदी सरकारविरोधातील व्यापक कटाचा भाग असू शकतो. पंतप्रधान  मोदी जितके लोकप्रिय होतीत, तितकीच अशा घटनांमध्ये वाढ होत जाईल,’ असे केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी म्हटले आहे.

राजस्थानातील अल्वर येथे शुक्रवारी रात्री अकबर खान या तरुणाची गो तस्करीच्या संशयावरून निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर  मेघवाल यांनी आपली  प्रतिक्रिया दिली आहे.  या  हल्ल्यांचा निषेध करून  ही काही पहिलीच घटना नाही. याचे मूळ आपल्याला इतिहासात शोधणे आवश्यक आहे.  या घटना  थांबवण्याची जबाबदारी कोणाची,’ असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मेघवाल यांनी या हत्यांचा संबंध मोदी सरकारच्या कारभाराशी जोडला. ‘मोदी जसजसे लोकप्रिय होती, तसतशा अशा हिंसक घटना वाढत जातील. बिहार निवडणुकीच्या वेळी ‘पुरस्कार वापसी’ झाली. यूपी निवडणुकीच्या वेळी सामूहिक हल्ल्यांनी वातावरण तापवले होते.  २०१९ मध्ये  आणखी काही असेल. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलल्या नवनव्या योजनांचे परिणाम दिसू लागले आहेत. त्याच्या या  प्रतिक्रिया आहेत,’ असेही मेघवाल म्हणाले.