मोदीच काय, डोनाल्ड ट्रम्प जरी आणले, तरी माझाच विजय – धनंजय मुंडे  

0
532

परळी, दि. १३ (पीसीबी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  परळी मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. तेच काय पण भाजपाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आणले, तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  म्हटले केला.

परळी मतदार संघातील घाटनांदूर येथील प्रचार सभेत मुंडे बोलत होते.

नेहमीप्रमाणे  परळी मतदारसंघात महिला व बालकल्याण मंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी १७ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचार सभा होणार होत. यावरून धनंजय मुंडे यांनी काहीही फरक पडणार नसल्याचे म्हटलं आहे.

मुंडे  म्हणाले की, भाजप पराभवाच्या भीतीने मोठ-मोठे नेते आणत आहे. पण भारतातील नेत्यांबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी परळीत सभेला आले तरी माझा विजय निश्चित आहे. परळी मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी रॅली काढण्यात आली ती  पहिल्यानंतर भाजपने धसका घेतला  आहे. म्हणून बड्या नेत्यांना  प्रचारासाठी आणले जात आहे.