Desh

मोदींनी संसदेत विश्वासमत जिंकला; भाजपचे केंद्रीतील सरकार स्थिर

By PCB Author

July 21, 2018

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – टीडीपीने मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला असून अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारने विश्वासमत ठराव जिंकला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेले कामकाज तब्बल १२ तास सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. मात्र मोदी सरकारने मोठ्या फरकाने विश्वासमत जिंकत विरोधकांना धक्का दिला. मोदी सरकारला एकूण ३२५ मते मिळाली, तर १२६ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मत नोंदवले.

मतदानासाठी लोकसभा सभागृहात एकूण ४५१ सदस्य हजर होते. यामधील ३२५ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात तर १२६ जणांनी बाजूने मतदान केले. बहुमत मिळाल्याने टीडीपीने मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. ११९ मतांनी मोदी सरकार विजयी ठरले. यावेळी ८४ खासदार सभागृहात गैरहजर होते, ज्यामध्ये शिवसेनेच्या खासदारांचाही समावेश होता.

भाजपाचे दोन खासदार के सी पटेल आणि भोला सिंह आजारी होते, मात्र मतदानासाठी ते सभागृहात पोहोचले. तर खासदार पप्पू यादव मतदान प्रक्रियेत भाग न घेताच सभागृहातून निघून गेले.