Maharashtra

मोदींनी मला चर्चेला न बोलवणं म्हणजे हा औरंगाबादच्या आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान – असुद्दीन औवेसी

By PCB Author

April 06, 2020

हैदराबाद,दि.६(पीसीबी) – पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनला (एआयएमआयएम) आमंत्रित करण्यात आलेलं नाही. हा औरंगाबाद आणि हैदराबादकरांचा अपमान असल्याची टीका एमआयएमचे प्रमुख खासदार असुद्दीन औवेसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशावर मोठ संकट येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावरून मोदींनी या चर्चेला मला निमंत्रण दिलं नाही हा तर औरंगाबादच्या आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान असल्याचं एमआयएमचे प्रमुख खासदार असुद्दीन औवेसी यांनी म्हटलं आहे.

https://mobile.twitter.com/asadowaisi/status/1246509938605584384

औरंगाबाद आणि हैदराबादकरांनी एमआयएमला पसंती दिली म्हणजे ते माणूस म्हणून कमी महत्त्वाचे आहेत का? तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय, यामागचं नेमकं कारण काय? आमच्या लोकांच्या व्यथा, मग त्या आर्थिक दृष्टीकोनातून असोत वा मानवतावादी दृष्टीकोनातून, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे, असं औवेसींनी ट्विटमध्ये म्हटलं म्हटलं आहे.