मोदींनी पंडित नेहरूंचा ‘प्रधानसेवक’ हा शब्द चोरला – राज ठाकरे

0
430

नांदेड, दि. १३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी  नेहरु, गांधी कुटुंबावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, पण मोदींनी  प्रधानसेवक हा शब्द आणला, तो शब्दही जवाहरलाल नेहरुचा आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगून मोदींना चुकीचा इतिहास माहित  असल्याची टीका केली.

नांदेडमध्ये  राज ठाकरेंची प्रचार सभा झाली.  या सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षात केलेल्या भाषणांच्या क्लिपचा आधार घेत  मोदींनी दिलेली आश्वासने किती पोकळ होती, हे आपल्या भाषणातून सांगितले. गेली साडेचार वर्ष मोदी यांनी जनतेंची फसवणूक केल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

राज ठाकरे म्हणाले की, जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर  मोदी आपल्या  भाषणात काहीच बोलत नाहीत. संपूर्ण निवडणूक पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांच्यावर केवळ आरोप करताना मोदी दिसत आहेत. मात्र बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्यांबद्दल कधी बोलणार,  असा सवाल  त्यांनी केला.