मोदींना मत देता, कामही त्यांच्याकडून करून घ्या; कुमारस्वामींचे वादग्रस्त विधान   

0
407

बंगळुरू, दि. २७ (पीसीबी) –  तुम्ही मतं नरेंद्र मोदींना दिली आणि माझ्याकडून काम करून हवे आहे. आणि तुम्हाला वाटते, की तुमच्या मागण्यांचा आदर करावा. लाठीचार्ज करायचे आदेश देऊ का? येथून चालते व्हा’ अशा   शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी   थर्मल पावर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना  सुनावले. कुमारस्वामींच्या या कृत्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.  

मुख्यमंत्री कुमारस्वामी आपल्या ‘ग्राम वास्तव्य’ कार्यक्रमासाठी रायचूरमध्ये आले होते. यावेळी  रायचूर जिल्ह्यातील येरमरूस थर्मल पावर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा रस्ता अडवून धरला होता. यावर मुख्यमंत्री कुमारस्वामी चांगलेच भडकले.

यावर  कुमारस्वामी म्हणाले की,  आपण कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी १५ दिवसांची वेळ मागितली होती. परंतु, त्यांनी रस्ता अडवून धरला आणि त्यामुळे आपल्याला राग अनावर झाला. असा जर पंतप्रधानांचा रस्ता अडवून धरला, तर त्याला कुणी स्वीकार करेल का?, असे  कुमारस्वामी म्हणाले.