Desh

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना निमंत्रण

By PCB Author

May 30, 2019

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.  

शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलेल्यांमध्ये ममता बिस्वास यांचेही नाव आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांमध्ये ममता यांचा मुलगा सुदीपदेखील होता. ममता बिस्वास पश्चिम बंगालच्या नदीया येथील रहिवासी आहेत.

शहीद जवान सुदीप यांची आई ममता  आज सकाळी दिल्लीत पोहोचतील. या कार्यक्रमात सुदीप यांचे वडील सहभागी होणार नाहीत. प्रकृतीच्या कारणांमुळे प्रवास करणे शक्य नसल्यानेच ते अनुपस्थित राहणार असल्याचे समजते.

पश्चिम बंगालच्या हावडा येथे राहणारे कॉन्स्टेबल बबलू संतरादेखील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. मात्र, त्यांच्या नातेवाईकांना निमंत्रण देण्यात आलेले आहे की नाही याची माहिती मिळू शकली नाही.