Desh

मोदींची अंगणवाडी सेविकांना गौरी गणपती सणाची भेट; मानधनात भरघोस वाढ    

By PCB Author

September 11, 2018

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करून गौरी गणपती सणाची भेट दि ली. ज्या अंगणवाडी सेविकांना सध्या ३ हजार रुपये मानधन मिळते, त्यांना आता ४ हजार ५०० रुपये मिळतील. तर ज्या सेविकांचे मानधन २२५० रुपये आहे, त्यांचे ३५०० रुपये होईल. अंगणवाडी सहाय्यकांना १५०० ऐवजी २२०० रुपये मिळतील, अशी घोषण पंतप्रधान मोदींनी केली.

मोदी यांनी आज (मंगळवार) अंगणवाडी सेविकांशी ‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे संवाद साधला.  यादरम्यान मोदींनी अंगणवाडी सेविकांना ही खुशखबर दिली. वाढीव मानधन पुढच्या महिन्यापासूनच लागू होणार आहे. जवळपास १४ लाखांपेक्षा जास्त अंगणवाडीसेविकांना याचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडीसेविका आणि त्यांच्या सहाय्यकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा कवचही मिळणार आहे.

मोदी यावेळी म्हणाले की,  देवाकडे हजारो हात असतात. म्हणजे देवाच्या शरिराला हात असतात असे नाही, तर त्यांच्यातर्फे काम करणारे अनेक लोक असतात. तुम्ही-अंगणवाडीसेविका माझे हात आहात. पोषणाचा थेट संबंध स्वास्थ्याशी आहे. त्यामुळे आमच्या सरकारने झुंझुनू राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात केली आहे,  असेही मोदींनी म्हटले .