‘मोठ्याने गप्पा मारू नका’ असं बजावलं म्हणून चक्क डोक्यात घातला दगड

0
246

भोसरी,दि.०५(पीसीबी) – मोठमोठ्याने गप्पा मारणा-या दोघांना एका व्यक्तीने मोठ्याने ओरडू नका, असे म्हटले. यावरून दोघांनी मिळून त्या व्यक्तीचे दगडाने डोके फोडले. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री दहा वाजता गणेशनगर, गवळी माथ्याजवळ भोसरी एमआयडीसी येथे घडली.

यल्लू मुकुंदा पवार (वय 40, रा. गणेशनगर, भोसरी एमआयडीसी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजय सिंग (वय 19), अर्पणसिंग (वय 45, दोघे रा. गणेशनगर, भोसरी एमआयडीसी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार त्यांच्या घरी असताना त्यांच्या वस्तीत राहणारे दोन्ही आरोपी त्यांच्या घरासमोर मोठमोठ्याने गप्पा मारत होते. त्यामुळे पवार यांनी त्या दोघांना ‘मोठ्याने ओरडू नका’ असे सांगितले. त्याचा राग आल्याने अर्पणसिंग याने पवार यांना पकडले आणि अजयसिंग याने पवार यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचे डोके फोडले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी पवार यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.