मोठी बातमी : शाळांची तारीख ठरली; राज्य शिक्षण आयुक्त हो म्हणाले…

0
650

पुणे,दि. 26 (पीसीबी) : कोरोनामुळे दोन महिन्यापासून बंद असलेल्या शाळांमधील अध्यापन 15 जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुरवातीला डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शिकवले जाणार आहे. ग्रीन झोनमध्ये शाळाही भरणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांच्या सातत्याने चर्चा करीत आहेत. त्यात येत्या 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयापर्यंत हा विभाग आलेला आहे. त्यामुळे शाळांचे वर्ग सुरू झाले नाही, तरी अध्यापन मात्र सुरू केले जाणार आहे.

राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी याबाबत माध्यम प्रतिनिधिला माहिती दिली.