Maharashtra

मोठमोठ्या गमजा मारणाऱ्या मोदी सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड अविचार व धेडगुजरी अंमलबजावणीचा – सचिन सावंत

By PCB Author

July 31, 2020

मुंबई,दि.३१(पीसीबी) – मोठमोठ्या गमजा मारणाऱ्या मोदी सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड अविचार व धेडगुजरी अंमलबजावणीचा आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्विट पोस्ट केलं आहे.

मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या शैक्षणिक धोरणासंदर्भात काँग्रेसने काहीशी चिंता व्यक्त केली आहे. सचिन सावंत यांनी एकामागोमाग एक ट्विट करत नव्या शैक्षणिक धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “जनतेने शिकू नये असं वाटणाऱ्या रेशीमबागेत जनतेने काय शिकावे हे ठरवले जाईल. मोठमोठ्या गमजा मारणाऱ्या मोदी सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड अविचार व धेडगुजरी अंमलबजावणीचा आहे. नियोजन आयोग गुंडाळले पण निती आयोग अजून काय करतं हा प्रश्न आहे”

नवीन शिक्षण धोरणाबाबत काही चिंता-
१. जनतेने शिकू नये असं वाटणाऱ्या रेशीमबागेत जनतेने काय शिकावे हे ठरवले जाईल ‌
२. मोठमोठ्या गमजा मारणाऱ्या मोदी सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड अविचार व धेडगुजरी अंमलबजावणीचा आहे.
३. नियोजन आयोग गुंडाळले पण निती आयोग अजून काय करतं हा प्रश्न आहे

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 31, 2020

दरम्यान नोटाबंदी व जीएसटी चे अपयश समोर आहे, असं सांगत मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया उठ इंडिया बस इंडिया सर्व फेल झाल्याचं ते म्हणाले. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री असताना पासून आजतागायत त्यांनी दाखवलेले एकही स्वप्न यशस्वी झाले नाही. उदा. डोलेरा, गिफ्ट सिटी, जीएसपीसी इ., असंही सावंत ट्विटमध्ये म्हणालेत.