मोक्कातील फरार आरोपी वाळके बंधूना अटक…

0
696

– तात्याचा ढाबा’ हॉटेल मालकाला अटक.. गायकवाड पिता-पुत्र येरवडा कारागृहात..

पुणे, दि. 20 (पीसीबी) – खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैध सावकारी आणि बळजबरीने जमिनी हडप केलेले डबल मोक्क्यातील आरोपी नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर त्यांचे साथीदार सचिन गोंविद वाळके आणि संदिप गोविंद वाळके यांना अटक करण्यात आली आहे. वाळके बंधू हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चतुश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होताच ते फरार झाले होते. मोक्का न्यायाधीस शिरसिकर साहेब यांचे कोर्टाने आरोपींना 7 दिवसांची (25 ऑक्टोबर पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली. सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस निरिक्षक समीर चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक सुप्रिया पंढरकर हे सदर गुन्हाचा तपास करत आहेत.

डबल मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गायकवाड आणि त्याचे साथीदारांवर अटक करुन कारवाई करण्यात आली होती. मात्र रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन वाळके आणि संदीप वाळके हे दोघे फरार होते. सदर गुन्ह्यात देखील दोघांचा मुख्य सहभाग होता. त्यांच्यावर सांगवी आणि चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. वाळके बंधूंनी औंध-बाणेर रोड येथे लोकांच्या जागेवर अवैध्यरित्या बळजबरीने ताबा मारुन त्यावर ‘तात्याचा ढाबा’ नावाचे हॉटेल सुरु केलेले, ते अल्पावधीतच प्रसिध्द झाले होते. गुन्ह्यातील मुख्य आरोपी नानासाहेब गायकवाड पित्रापुत्राला पुणे पोलीसांनी कर्नाटकमधील उडपी येथून अटक केली होती.

मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ भाऊ सह त्याच्या साथीदारांविरोधात मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणीपद्धतीने सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.