मॉर्निंग वॉकसाठी जाताय सावधान!

0
235

चिंचवड, दि.२७ (पीसीबी) – पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रेलविहार रोड, चिंचवडेनगर येथे घडली.

श्रद्धा केदार बिरादार (वय 46, रा. बळवंत नगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर रोजी फिर्यादी बिरादार या पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. साडेपाच वाजता रेलविहार रोड, चिंचवडेनगर येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बिरादार यांच्या गळ्यातील 8 ग्रॅम वजनाचे 45 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. याबाबत 26 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.