मैदानावरील अपयशी पृथ्वी सोशल मीडियावर हिट

0
190

नवी दिल्ली, दि. 17 (पीसीबी) : सोशल मिडीयाच्या जमान्यात कोणी कधी हिट होईल सांगता येत नाही. त्यासाठी छोटेसे कारणही पुरते. भारताचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉने असेच कारण आज नेटकऱ्यांना दिले आणि तो एका क्षणात सोशल मिडीयावर हिट झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल जोडी मैदानावर खेळायला उतरली. मिशेल स्टार्कच्या दुसऱ्याच चेंडूंवर पृथ्वी शॉचा त्रिफळा उडाला. अलिकडच्या काळातीरल अपयशाने येथेही त्याची पाठ सोडली नाही. पृथ्वी शून्यावर बाद झाला आणि तिकडे नेटकऱ्यांनी त्याला लक्ष्य केले.

शुभमन गिलच्या जागी पृथ्वीला पहिल्या कसोटीसाठी संधी देण्यात आली होती. न्यूझीलंड दौरा आणि त्यानंतर आयपीएलमध्येही पृथ्वी फारशी चमक दाखवू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्या समावेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आपीएलमध्ये पृथ्वीला १३ सामन्यात २२८ धावाच करता आल्या. अखेरच्या आठ सामन्यात तर त्याच्या धावा १९, ४, ०, ०, ७, १०, ९ आणि ० अशा होत्या.

इतक्या अपयशानंतरही त्याला संधी मिळाली होती. मात्र, तो अपयशी ठरला आणि सोशल मिडीया त्याची खिल्ली उडवण्यात गर्क झाली. याला कुणी तरी शिकवा रे इथपासून त्याची शिकवणी घ्यायला सुरवात झाली होती. नियमित क्रिकेट पाहणारा देखील तंत्र कसे असते हे सांगू शकतो, मग सतत खेळणाऱ्या पृथ्वीला हे कळू नये अशी एक टिका वाचायला मिळाली.

मालिकेसाी संघ निवड झाल्यापासून गिल की शॉ या चर्चेला वेग आला होता. सराव सामन्यातही शॉ चमक दाखवू शकला नाही. त्याची फलंदाजी पाहून अॅलन बोर्डर यांनी देखील हा फलंदाज फ्लॅट विकेटवर अिधक यशस्वी होईल, वेगवान खेळपट्टीवर याच्या मर्यादा स्पष्ट होतील असे सांगितले होते. त्याला येथे यशस्वी व्हायचे असेल, तर फटक्याची निवड अचूक करावी लागेल, असेही त्यांनी म्हटले होते. त्याच वेळी त्यांनी आपल्याला गिलची निवड अधिक संयुक्तिक वाटते असे मतही त्यांना मांडले होते. सलामीच्या फलंदाजांने खेळपट्टी काय रंग दाखवते, गोलंदाज काय करू शकतोय याचा अंदाज घ्यायचा असतो. पण, पृथ्वीला यासाठी वेळच मिळाली नाही. काही कळायच्या आत तो बाद झाला.