Lifestyle

मेडिटेशन म्हणजे काय? आजच्या धावपळीच्या जगात मेडिटेशन का महत्वाचे आहे?

By PCB Author

September 22, 2020

आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला स्वतःकडेच लक्ष द्यायला वेळ नाहीये. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत काहींना काही ऍक्टिव्हिटी करत असतो. पण यातल्या किती ऍक्टिव्हिटीस आपण आपल्यासाठी करतो? कधी विचारलाय हा प्रश्न स्वतःला? नाही ना? आज आपल्याला आपल्यासोबत घालवायला सुद्धा वेळ नाहीये, इतके आपण व्यस्त असतो?

या धावपळीत आपल्याला वेगवेगळ्या इमोशन्सशी सामना करावा लागतो आणि या सगळ्याचा अप्रत्यक्षरीत्या परिणाम हा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती होत असतो. त्यामुळे, या सगळ्यांमध्ये आपण आपल्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यासाठी मेडिटेशन हा सर्वात उत्तम पर्याय आहे. दररोज १५-२० मिनिटे मेडिटेशन केल्याने आपण शारीरिक, मानसिक व्याधींपासून लांब राहू शकतो.

मेडिटेशन म्हणजे नक्की काय? मेडिटेशन म्हणजे ध्यान लावणे. या ध्यानाला जर आपण आपल्या दैनंदिनीतील १५-२० मिनिटे दिली तर, याचे अनेक फायदे समोर येतात. जर का तुम्ही अजूनही मेडिटेशन करत नसाल तर हे फायदे वाचून तुम्ही नक्की मेडिटेशन कराल. मग एकदा वाचाच कि, हे फायदे नक्की काय आहेत…

1. नियमितपणे मेडिटेशन केल्यास अशांत, चंचल मनावर नियंत्रण ठेवता येते. 2. जर का आपल्याला सतत गोष्टी विसरण्याची सवय असेल, तर मेडिटेशन केल्याने आपली बुद्धी तेज              होण्यास मदत होते. 3. मन शांत करण्यासाठी रागीट लोकांवर मेडिटेशन खूपच प्रभावी आहे . 4. हृदयरोगावर नियंत्रणासाठी एक उत्तम औषधी म्हणून डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. 5. ज्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसते त्यांनी देखील मेडिटेशन आपल्या जीवनात समाविष्ट करावे. 6. रात्रीच्या जेवणाच्यापूर्वी ध्यानासाठी बसावे. सकाळी सूर्योदयाचा आधी ध्यान करावं कारण त्यावेळी               शांततेचं वातावरण असत. 7. शांती, सामर्थ्य, समाधान, विद्वत्ता आणि सर्व गरजांना ध्यान पूर्ण करतं.

मेडिटेशन(ध्यान)ला योगसाधने मध्ये महत्वाचे स्थान आहे. यामुळे आपली मानसिक, शारिरीक स्थिती उत्तम राहते. मेडिटेशन शांत ठिकाणी केल्यास आपले चित्त विचलित होत नाही.