मेट्रो भवन आणि मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या शिळेवर मराठी भाषा नसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा

0
469

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी वांद्रे संकुलात तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करण्यात आली. तसेच मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले. यावेळी मेट्रो भवन आणि मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या शिळेवर मराठी भाषा नसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्राची ‘हिंदी’पणाकडे वाटचाल होत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर #मराठी नाही, काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी मात्र आहे! महाराष्ट्राची हिंदीपणाकडे वाटचाल. राज्य शासनाचा निषेध, असे ट्वीट देशपांडे यांनी केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रथम मेट्रो कोच का उद्घाटन समारोह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत सरकार के कर कमलों द्वारा संपन्न हुआ’ असे उद्घाटन शिळेवर लिहिलेले दिसत आहे.

यापूर्वी अनेकदा मनसेने मराठीसाठी आंदोलने केली आहेत. काही दिवसांपूर्वीच ईडीने राज यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसेनेसुद्धा ईडीला पाटी बदलण्यासाठी नोटीस पाठवली होती.