मूर्खांचे एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस – अमित शहा

0
480

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – मूर्खांचे एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस आहे. भारताची तुकडे तुकडे गँग, माओवादी, नकली कार्यकर्ते आणि भ्रष्ट लोकांचे समर्थन करा, ईमानदारीने काम करणाऱ्यांना बदनाम करा, राहुल गांधींच्या काँग्रेसचे स्वागत आहे’, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली.   

कोरगांव भीमा हिंसा आणि नक्षली कनेक्शनप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर केलेली कारवाई योग्यच होती, असे स्पष्ट करून  या कारवाईमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यानंतर  अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांच्यावर  जोरदार हल्ला चढवला.

ज्या लोकांनी राष्ट्रीय सुरक्षेचे राजकारण करून त्याला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अशा सर्वांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे शहरी नक्षलवादावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेससाठी हीच योग्य वेळ  आहे, असा टोलाही शहा यांनी लगावला.