Maharashtra

‘मुस्लीम मुलाशी प्रेमसंबंध असल्याने हृतिकच्या बहिणीला कुटुंबीयांकडूनच मारहाण’; कंगनाच्या बहिणीचा आरोप

By PCB Author

June 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मुस्लीम मुलाशी प्रेमसंबंध असल्याने हृतिकची बहीण सुनैना रोशन हिला कुटुंबीयांकडून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक आरोप अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चांडेलने केला आहे. सुनैना ही सारखी कंगनाला फोन करून मदतीसाठी विनवणी करत असल्याचेही तिने म्हटले आहे. रंगोलीने ट्विट करत ही संपूर्ण माहिती दिली.

‘सुनैना रोशन कंगनाकडे मदत मागत आहे. दिल्लीतल्या एका मुस्लीम तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याने रोशन कुटुंबीयांकडून तिला त्रास दिला जात आहे. गेल्या आठवड्यात तिला महिला पोलिसाकडून मारण्यात आलं. तिच्या वडिलांनीही तिच्यावर हात उचलला होता. तिचा भाऊ तिला कारागृहात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सुनैना सतत रडत कंगनाला मदतीसाठी फोन करत आहे. कंगनाने आता तिचा नंबर ब्लॉक केला आहे पण आम्हाला तिच्या सुरक्षिततेची काळजी आहे. प्रत्येकाला प्रेम करण्याचा हक्क आहे. माझ्या ट्विटमुळे तरी रोशन कुटुंबीय तिला त्रास देणे बंद करतील अशी अपेक्षा आहे. सुनैनाचे सगळे मेसेज व फोन कॉल्स मी रेकॉर्ड करून ठेवले आहेत,’ असे ट्विट रंगोलीने केले आहे.

सुनैनाने नुकतेच ट्विट करत ‘माझा कंगनाला पूर्ण पाठिंबा आहे,’ असे म्हटले आहे. हृतिक व कंगनाच्या प्रकरणानंतर कंगनाची बाजू घेता न आल्याबद्दल सुनैनाने माफीसुद्धा मागितली होती. तर दुसरीकडे सुनैना दुभंगलेले व्यक्तीमत्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांत होत्या. सुनैनाने या चर्चा खोट्या असल्याचे स्पष्टदेखील केले होते. आता या संपूर्ण प्रकरणात हृतिक रोशन किंवा रोशन कुटुंबीय काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.