मुस्लीम आरक्षणावरून मुस्लीम आमदार आक्रमक; विधानसभा अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न

0
650

मुंबई, दि. २० (पीसीबी) – राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा  आज दुसरा दिवसही गोंधळात सुरू झाला. मराठा, धनगर आरक्षणानंतर आता मुस्लीम आरक्षणावरून मुस्लीम आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अबू आझमी, आसिफ शेख, अब्दुल सत्तार, सतीश पाटील, अमीन पटेल आणि असलम शेख या सहा आमदारांनी आज (मंगळवार) विधानसभा अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाच्या  दिशेने कागद भिरकावले. त्यानंतर राजदंड पळवण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. यावरुन विधानसभेत जोरदार गदारोळ  झाला. या गदारोळातच विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केले आहे. कामकाज तहकूब होण्याची  आज ही दिवसभरातील  चौथी वेळ आहे.

दरम्यान, आम्ही कधी सेलिब्रेशन करायचे, मुख्यमंत्री तारीख सांगा, असे बॅनर घेऊन एमआयएमचे आमदार  वारिस पठाण आणि इम्तियाज जलील  सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात दाखल झाले होते.