“मुस्लिम चार विवाह करतात, मग धनंजय मुंडेंनी दोन केली तर बिघडले कुठे ?”

0
512

नवी मुंबई, दि.१३ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दोन पत्नींसंदर्भातील द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांनी कायद्याचे उल्लंघन केले नाही, असं म्हणत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी पाठराखण केली आहे. मुस्लिम नागरिक चार विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय ? असा सवाल सेंगर यांनी विचारला.

भारताच्या राज्यघटनेने सर्व धर्म समभाव तत्त्व स्वीकारले आहे. तेव्हा द्विभार्या प्रतिबंधक कायदा निरर्थक ठरला आहे. त्यामुळेच सर्व धर्मांना विवाह बंधनाचे वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत, असले तरी ते निरर्थक ठरतात, फक्त हिंदू धर्मीयांनाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. कारण राज्यघटना सर्व धर्म समभाव आहेत, असं अजय सिंह सेंगर म्हणाले.

मुस्लिम 4-4 विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय? पहिल्या पत्नीपासून सकारात्मक सुख मिळत नसेल, तर मुस्लिमांप्रमाणे हिंदू दूसरे लग्न करु शकतात, असं मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केलं. द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे बंधन मुस्लिम, ख्रिस्ती धर्मीयांना का नाही? असा सवालही सेंगर यांनी विचारला.