Desh

मुस्लिमांची घरे पाडल्याने ओवेसींना रडू कोसळले

By PCB Author

April 29, 2022

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – सध्या देशभरात मुस्लिमांवरील त्याचारात वाढ होऊ लागलीय. त्यातच हनुमान चालिसा, मशिद भोंगा वाद देखील खूप गाजत आहे. मुस्लिमांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराबाबत ओवैसींनी दु:ख व्यक्त केलंय. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी हैदराबादमध्ये नमाजानंतर भावूक झाले आणि भाषणादरम्यान त्यांना रडू कोसळलं.

भाषणादरम्यान ओवैसी म्हणाले, खरगोनमध्ये मुस्लिमांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. जहांगीरपुरीत मुस्लिमांवर अत्याचार झाले, त्यांची दुकानं उद्ध्वस्त करण्यात आली, यामुळं खूप दु:ख होत आहे. पण, आम्ही अत्याचार कदापि सहन करणार नाही. कारण, आम्ही मृत्यूला घाबरत नाही. तुमच्या राजवटीलाही घाबरणार नाहीय. यापुढं आम्ही संयमानं काम करू, पण मैदान सोडणार नाही, असा इशारा ओवैसींनी दिलाय.