Desh

मुसलमानांनी काँग्रेसला अजिबात मतदान करू नये – ओवेसी

By PCB Author

October 19, 2018

हैदराबाद, दि. १९ (पीसीबी) – मुसलमानांनी काँग्रेसला अजिबात मतदान करू नये, असे आवाहन करत एमआयएम नेते असरुद्दिन ओवैसी यांनी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

आता काँग्रेसमधील २० टक्के हिंदू नेतेही प्रचाराला बोलवत नाही, अशी खंत ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठात व्यक्त केली होती. भारतात धार्मिक तेढीचे वातावरण निर्माण होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर ओवैसींनी काँग्रेसवर टीका केली आहे.’ आझाद यांचे वक्तव्य सूचक असून काँग्रेसला मुसलमानांचे काहीच महत्त्व राहिलेले नाही. त्यामुळे यापुढे काँग्रेसला मुसलमानांनी काँग्रेसला मतदान करू नये हाच याचा अर्थ आहे, असे ओवैसी म्हणाले.

एकीकडे गुलाम नबी आझादांना अशी वागणूक मिळत असताना दुसरीकडे राहुल गांधीं मध्यप्रदेशात प्रचारादरम्यान सर्व महत्त्वाच्या मंदिरांचं दर्शन घेत आहेत. जास्तीजास्त हिंदूची मत मिळण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे, अशा परिस्थितीत येत्या २०१९ लोकसभा निवडणुकीत मुस्लिम जनता कोणाला मतदान करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.