Maharashtra

मुश्ताक अली स्पर्धेचे सामने मुंबईत

By PCB Author

December 17, 2020

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : महाराष्ट्रात अजून मैदानावर खेळण्याची परवानगी मिळालेली नसताना बीसीसीआयने या वर्षीच्या सईद मुश्ताक अली टी २० स्पर्धेसाठी आपल्या सहा केंद्रांपैकी एक केंद्र म्हणून मुंबईची निवड केली आहे. मुंबईसह बंगळूर, कोलकता, बडोदा, इंदूर आणि चेन्नई अशा सहा केंद्रांवर या वेळी सईद मुश्तक अलू टी २० स्पर्धा रंगणार आहे. बीसीसीआयने आज या स्पर्धेसाठी सहा केंद्र जाहिर केली. जैव सुरक्षा पद्धतीने ही स्पर्धा १० ते ३१ जाने जानेवारी दरम्यान या केंद्रावर पार पडेल.

सहभागी ३८ संघांना पाच एलिट (ए, बी, सी, डी, ई) विभागात विभागण्यात आले आहे. चंदिगड, बिहार, नाणि नॉर्थ ईस्ट कडील राज्य असे आठ संघ प्लेट विभागात खेळणार आहेत. मैदाने उघडण्यास परवानगी मिळाली असली, तरी महाराष्ट्र सरकारने अजून खेळण्याची परवानगी दिलेली नाही. स्पर्धा सुरु होईपर्यंत महाराष्ट्र सरकार याला मान्यता देईल, असा विश्वास बीसीसीआयकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत ई गटातील सामने होणार आहेत. म्हणजेच आ स्पर्धेत मुंबई आपले सर्व सामने घरच्या मैदानावर खेळेल. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस महाराष्ट्रात परवानगी मिळाली नाही. बैठक अहमदाबाद येथे हलविण्यात आली आहे, अशा वेळी मुंबईला सामन्याचे केंद्र म्हणून जाहिर करण्याचे धाडस बीसीसीआयने दाखवले आहे.

अशी आहे विभागणी एलिट ए (बंगळूर) – जम्मू-काश्मिकर, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, रेल्वे आणि त्रिपुरा एलिट बी (कोलकता) – ओडिशा, बंगाल, झारखंड, तमिळनाडू, आसाम, हैदराबाद एलिट सी (बडोदा) – गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, बडोदा, उत्तराखंड एल्ट डी (इंदूर) – सेनादल, सौराष्ट्र, विदर्भ, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा एलिट ई (मुंबई) -हरियाना, आंध्र प्रदेश, दिल्ली, मुंबई, केरळ, पुडुचेरी प्लेट (चेन्नई) – छत्तीसगड, मेघालय, बिगहार, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेश