मुलीचा फोन का येतोय, अशी विचारणा करणाऱ्या पत्नीला पतीकडून पट्ट्याने मारहाण; सांगवीत गुन्हा

570

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – अनोळखी मुलीचा फोन सतत का येत आहे, अशी  विचारणा करणाऱ्या पत्नीला पतीने कंबरेच्या पट्ट्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पिंपळेगुरव येथे घडला.

या प्रकरणी २५ वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती प्रेम दामोदर पवार (वय २९) सासू भाग्श्री दामोदर पवार, सासरे दामोदर पवार, दीर रामेश्वर पवार (सर्व रा. फ्लॅट. १७ बी.१ साईराज रेसिडेन्सी, पिंपळेगुरव) नातेवाईक कैलास पवार (रा. खोपटी, तांडा, गेवराई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेम याला सतत एका मुलीचे फोन येत होते. याबाबत फिर्यादी पत्नीने पतीला जाब विचारला. या रागातून पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच माहेरहून तीन लाख रूपये आण, नाहीतर कर्ज काढून देण्याची मागणी करत प्रेमने तिला पट्ट्याने मारहाण केली.

या प्रकरणाचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहे.