मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल

0
290

पिंपरी, दि. २२ (पीसीबी): मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्या प्रकरणी आरोपी शैलेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस पुढील कारवाई करत आहेत. मुलांचे शैक्षणिक वर्ष हॅचिंग शाळेने वाया घालवले, आम्हाला न्याय मिळत नाही, असा दावा आरोपी शैलेश शिंदेंसोबतचे पालक संतोष पोलकमवार यांनी केला आहे..
मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून शिंदेंनी गृह विभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. संध्याकाळी ईमेल मिळाल्यानंतर तातडीची पावलं उचलत पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या शैलेश शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
आम्हाला न्याय नाही मिळाला, म्हणून हा पेपर बाँम्ब आहे. निदान आता तरी सरकार आम्हाला न्याय देईल किंवा देईल की नाही माहिती नाही. आम्ही शिक्षण विभाग, मुख्यमंत्री कार्यालय आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांना पत्र पाठवली, ईमेल केले, मात्र तरीही आम्हाला न्याय मिळत नाही. मुलांना नापास करण्यात आलं. आमच्या मुलांना शिक्षणापासून हॅचिंग शाळेने वंचित ठेवलं” असा आरोप संतोष पोलकमवार यांनी केला आहे.
शिक्षण विभागाकडे तक्रार केली म्हणून शाळा आम्हाला मुद्दाम त्रास देत आहे. आधी 15 मुलांचा प्रश्न होता मात्र आता 3 मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना 150 मेल केले, मात्र उत्तर दिलं नाही. मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. पाचवीपासून हॅचिंग शाळा त्रास देत आहे. मुलांना जूनमध्ये पास करण्याऐवजी सप्टेंबरमध्ये प्रमोट करते. 2016 पासून हे सुरु आहे” असा आरोपही संतोष पोलकमवार यांनी केला आहे..