Pimpri

मुलांवर का ओरडता असे विचारणा-या पत्नीला पतीची मारहाण

By PCB Author

April 24, 2021

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मुलांवर का ओरडता असे विचारणा-या पत्नीला पतीने मारहाण केली तसेच, हातावर चाकू मारुन जखमी केले. गुरुवारी (दि. 22) पूर्णानगर, चिंचवड येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी आरती सखाराम लवटे (वय 42, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. 23) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सखाराम मंजुनाथ लवटे (रा. पूर्णानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती-पत्नी आहेत. आरोपी सखाराम कामावरुन घरी आल्यावर मुलांवर ओरडले. पत्नीने मुलांवर का ओरडता असे विचारले. त्यावरून आरोपी पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच, चाकूने हाताच्या बोटावर वार करून जखमी केले. अधिक तपास पोलीस हवालदार गोडांबे करीत आहेत.