‘मुलगी झाली हो’. विरूष्का झाले दोनाचे तीन; ट्विट करत विराटने दिली आनंदाची बातमी

0
300

मुंबई, दि.११ (पीसीबी) : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरात चिमुकलीच आगमन झालं आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली.

विराटने पोस्ट शेअर करत हि आनंदाची बातमी दिली आहे कि, ‘आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो,’

ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकलीच आगमन झालं आहे.